दिग्रसकर यांच्याकडे माध्यमिक तर सोनटक्के हिंगोलीतच

नांदेड

 

नांदेड, बातमी24:-राज्य शासनाकडून पंधरा टक्के बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जात आहे.त्यानुसार नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर त्यांची विनंतीवरून माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे,तर प्राथमिक चे शिक्षणाधिकारी म्हणून बदलीने नांदेड येथे येणारे संदीपकुमार सोनटक्के हे वर्षेंभर हिंगोलीतच राहणार असून दिग्रसकर यांच्याकडे प्राथमिक विभागाचाही पदभार राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मागच्या आठवड्यात दिग्रसकर यांची बदली लातूर येथे झाली होती तर हिंगोली शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के हे नांदेड येथे बदली झाली होती.मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी नांदेड येथील काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या माध्यमातून मंत्रालयास्तरावर शिस्टाई साधत विनंती बदली करण्यात दिग्रसकर हे यशस्वी झाले आहेत.त्यांची विनंतीवरून नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून दि.9 रोजी आदेश प्राप्त झाले आहे.