नांदेड,बातमी24:- विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवस जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या दालनात करण्यात आला. यावेळी फटाके आतिषबाजी करून राजूरकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेस पदाधिकारी हजर होते.
नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील मोठं नाव आणि काँग्रेस पक्षाचे उत्तम संघटक अशी ओळख असलेले आमदार अमरनाथ राजूरकर यांचा वाढदिवस शुक्रवार दि.24 रोजी होता. या निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी जिल्हा परिषद इमारतीमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक,सभापती बाळासाहेब रावनगावकर, विजय येवनकर,विठ्ठल पाटील डक,संतोष पाडांगळे,बबन बाराशे,संतोष बोनलेवाड,सरोदे,भुजबळ यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होती.