बुधवारी जिल्हाधिकार्‍यांचे तीनशेचे टार्गेट

नांदेड

नांदेड, बातमी24ः- 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बुधवार दि. 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, असून या शिबिरामध्ये तिनशे जण रक्तदान करतील,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली.

मागच्या तीन महिन्यांपासून शासकीय सेवा बजावणारी डॉक्टर, नर्स व व शासकीय रुग्णालयातील टीम जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या लढाईत उतरले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनामधून रुग्णांना बरे करण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालय चालविणारे डॉक्टर्स मात्र कोरोनाच्या भितीपोटी रुग्णालय बंद करून होती. शासनाच्या दमदाटीपोटी अशांनी रुग्णालय सुरु केली आहेत.

संकटाच्या काळात चार हात दुर राहणारे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा देणार्‍या शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत खासगी डॉक्टरांची सेवा म्हणून तुलना होऊ शकत नाही. तरीही उद्या होणार्‍या डॉक्टर्स डे मध्ये सर्व डॉक्टर्स असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डॉक्टर्स डे च्यानिमित्ताने सामाजिक व आरोग्य दृष्टीकोनसमोर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात तिनशे रक्तदाते रक्तदान करतील, असा अंदाज व अपेक्षा व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यापेक्षा अधिक रक्तदान होऊ शकते.यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बचत भवन येथे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु होणार आहे.