जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसिकर यांचा गौरव

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात उत्तमरीत्या आरोग्य सेवा सामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कोरोनाच्या संसर्गाने सर्वत्र थैमान घातले होते. या काळात सामान्य नागरिक भयभीत झाले. अशा काळात सामान्य रुग्णांना सेवा मिळावी,यासाठी जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय स्तरावर व्यवस्थित रित्या नियोजन करून रुग्णांना सेवा पोहचविण्याचे महत्वाचं कार्य पार पाडले. या कार्य सेवेची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, आम्ही केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाने योग्य तो सन्मान केल्या बद्दल डॉ.भोसीकर यांनी आभार मानले.