या कारणांमुळे काँग्रेसला महारक्तदान शिबीर करावे लागले रद्द

नांदेड

या कारणांमुळे काँग्रेसच्या महारक्तदान शिबिराला बे्रक

नांदेड,बातमी24ः-माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षपुर्तीनिमित्त पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्यावतीने दि.14 जुलै रोजी येथील भक्ती लॉन्समध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासंबंधी पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरु होती. मात्र दि. 12 जुलैपासून संचारबंदी आदेश लागू होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला रक्तदान शिबीर रद्द करावे लागले आहे.

प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्याच्या हलचाली काही दिवसांपासून सुरु होत्या. या हलचालींना अखेर दि. 10 जुलै रोजी मुहर्त लागला, यासंबंधीचे आदेश 10 रोजी प्रसिद्ध करण्यात आले असलेत,तरी दि. 12 जुलैपासून संचारबंदी आदेश प्रत्यक्षात अंमल होणार आहेत.या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस पक्षाने आयोजित केलेले महारक्तदान शिबीर स्थगित करण्यात आले असल्याचे काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी कळविले.

 

हे शिबीर नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेसच्यावतीने दि.14 जुलै रोजी येथील भक्ती लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले होते. या शिबीराची काँग्रेस पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट काँग्रेस पक्षाने निर्धारित केले होते. परंतु आचारसंहिता असल्यामुळे महारक्तदान शिबीर रद्द करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद व महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी आज येथे दिली