शिक्षण सभापती बेळगे यांची विविध विषयावर शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण विभागासंबंधी आढावा सादर करून चर्चा केली. संबंधित मागण्या व प्रश्ना संबंधी सकारात्मक विचार करू असे आश्वासन मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण सभापती संजय बेळगे यांना दिला. या वेळी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेतला. या वेळी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. कोरेानाच्या पार्श्वभूमिवर शाळा सुरु करणे आजघडिला अशक्य असल्याची बाब त्यांनी निर्देशनास आणून दिली. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण हा महत्वाचा भाग असून यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता बेळगे यांनी नमूद केली.

ऑनलाईन शिक्षणासह जिथे कुठे सुरक्षित अंतर पाळून शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल,त्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदेकडून सुरु असल्याचे बेळगे यांनी यांनी वेळी सांगितले. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारने दखल घ्यावी अशी मागणी या वेळी संजय बेळगे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.