लाच स्वविकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-वाळूचे तीन टिप्पर चालू देण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून 30 हजार रुपये हप्ता देण्यात यावा,अशी मागणी करून आतापर्यंत त्यातील 11 हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले,की लोहा लालुक्यातील कापशी मंडळ अधिकारी ननहू गणपतराव कानगुळे (46) याने टिप्पर चालू देण्यासाठी प्रति गाडी 10 हजार रुपये प्रमाणे देण्याची मागणी केली होती.

22 वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत विभागाने तक्रार केली. यातील 10 हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले होते.तर 11 हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न शुक्रवार दि.3 जुलै रोजी केला होता. यावरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने नंदेश ग्रामीण पोलिसठाण्यात गुन्हा नोंद केलं. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कपिल शेळके हे करत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय डोगरे यांच्या मार्गदर्शनात या पथकात पोलीस कर्मचारी जगनाथ आंनतवार,एकनाथ गंगातीर्थ, शेख मुजीब,विलास राठोड,ताहेर फहाद खान यांच्या पथकाने केली.