केंद्रातील भाजपमुळे शेतकरी देशोधडीला:-अशोक चव्हाण

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- केंद्रातील भाजप सरकारचे धोरणे हे शेतकऱ्याच्या मुळावर उठणारे असून या सरकारमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागत असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली, ते नांदेड येथील आयोजित किसान अधिकार दिनाच्या निमित्ताने बोलत होते.

स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्त काँग्रेसच्या वतीने किसान अधिकार दिनाचे आयोजन शनिवार दि.31 रोजी केले होते. यानिमित्त काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मार्च व गांधी पुतळा येथे सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

यावेळी डी. पी. सावंत, आ.अमर राजूरकर,आ.मोहन हंबर्डे, सुभाष वानखडे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबुलगेकर,जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर,साहेबराव धनगे,महेंद्र पिपळे,जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.

अशोक चव्हाण म्हणाले,की केंद्रातील भाजप सरकारमुळे बाजार समित्या उद्धवस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, आतापर्यंत एक ही धोरण शेतकऱ्याच्या हिताचे राबविले नाही.मोदी हे बहुमताच्या आधारे मनमानी करत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.