नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या दुसNया लाटेत नांदेड जिल्ह्याने एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३४ हजार ६३४ रुग्ण नोंदविले. रुग्णसंख्येचा हा दर २६.९ टक्क्यापर्यंत पोहंचला. मात्र त्यानंतर राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आजच्या घडीला हा रुग्ण दर १.७ टक्क्यांपर्यत खाली आला आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर सुध्दा नागरिकांनी सतर्वâता बाळगायची आहे, दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे आहे, यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.
कोरोनाच्या दुसNया लाटेत नांदेड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येचा टप्पा गाठल्यानंतर जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग आणि शल्यचिकित्सकांनी त्यासोबत प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या प्रभावी अंमलबजावणीनंतर आजघडीला कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर १.७ टक्क्यावर आला आहे. असे असले तरी लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानंतर देखील जनतेने काळजी घ्यायची आहे. पाच टक्क्याच्यावर रुग्णसंख्येचा दर वाढला तर पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या नामुष्की आपल्या जिल्ह्यावर येऊ शकते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेने याबाबत काळजी घेण्याचे गरज असल्याचे मत त्यांनी प्रतिपादीत केले.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता आपल्या सर्वांच्या पुढाकाराची गरज असून, उपलब्ध लसी शहरी आणि ग्रामीण भागात नियोजनबध्द पध्दतीने देवून लसीकरणासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, जेणेकरुन कोरोना मुक्तीकडे आपल्याला वाटचाल करता येईल. २१ जूननंतर मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होतील हे लक्षात घेता लसीकरणाचे २५ लक्षाचे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचे आहे, आजपर्यंत जवळपास पाच लक्ष नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविला असून, शेळगाव गौरी या गावाने शंभर टक्के लसीकरण केल्यााची माहिती यावेळी देण्यात आली.
म्युक्रामायकोसिसचे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २०१ रुग्ण सापडले असून, उशिरा रुग्ण दाखल झाल्याने त्यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या सुधारणेत लक्षणीय वाढ होत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. नांदेड जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी १९१० एवढा रुग्ण संख्येचा उच्चांक कोरोनाने गाठला. आता १३१ वर पोहंचला असून, मृत्यूचीही संख्या आता कमी झाल्याचे जिल्हाधिकाNयांनी सांगितले.
प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे तसेच लॉकडाऊनच्या निर्बंधाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आपण रुग्णसंख्या कमी करु शकलो, यासाठी प्रसिध्दी माध्यमे, तसेच जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठावूâर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीळवंâठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.