जिल्हा परिषदेचे माजी सभापतीचे कोरोनामुळे निधन

नांदेड

नांदेड,बातमी24ः जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू नांदेड येथील खासगी रुग्णालयात झाला.

काही दिवसांपूर्वी उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचा कोरोनाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कौडेगाकवर हे सन 2008-2010 या वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून जबाबदारी पार पाडली.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.
——-
जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मयत उद्धवराव पाटील कौडेगावकर यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व सुन हे सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले, असून त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.