नांदेड, बातमी24ः- गोदावरीच्या वरच्या भागात पाऊस चांगला आला झाल्याने गोदावरी दुतोंडी भरून वाहत असून विष्णपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या विष्णुपुरी जलाशयाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता,रात्रीतून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पाऊस असाचा बसरत राहिल्यास पुढील काळात कायम नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे लागणार आहे.
या मौसमात विष्णुपुरी जलाशय जुलै महिन्याच्या शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे पुढील काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रयत्न मिटला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे एक दरवाजा उघडण्यात आला होता. 471 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पहाटे पाच वाजेपर्यंत दरवाजा उघडा होता. जलाशयात जिवंत पाणी साठा 82.68 टक्के इतका आहे.