जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये दमदार पाऊस

नांदेड

नांदेड, बातमी24ः- श्रावण सरी सगळीकडे कोसळू लागल्या आहेत. मागच्या चौवित तासात जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस झाला, असून सर्वाधिक पाऊस किनवट,माहूर हदगाव व हिमायतनगर तालुक्यात झाला आहे.

यंदाचा पावसाचा मौसम सुरुवातीपासून चांगला राहिला आहे. अवघ्या दीड महिन्यांच्या काळात चाळीस टक्के पाऊस झाला आहे. सदरचा पाऊस पिकांना ही पोषक ठरला आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये सर्वाधिक 50.29 मिलीमीटर पावसाची नोंद किनवट तालुक्यात, माहूर तालुक्यात 46.25, हिमायतनगर तालुका 43.67, हदगाव तालुक्यात 29.43, भोकर तालुक्यात 29.25 व त्यानंतर मुदखेड तालुक्यात 21.38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र बाकीच्या सर्व तालुक्यात नगण्य पाऊस झाला आहे

किनवट शहरात 62, इस्लापुर-56, मांडवी-22, बोधडी-44, दहेली-24, जलदरा-52, तर शिवनी मंडळात तब्बल 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मदखेड तालुक्यातील बारड शिवारात-45, हदगावमध्ये 37, पिंपरखेड- 36, तळणी-41 व आष्टी मंडळात 32, हिमायतनगर-38, सरसम-53,जवळगाव-40, भोकर-24, किनी-33, मोगली-38, मातुळ-22, उमरी तालुक्यातील शिंद्धीमध्ये 36, माहूर-41, वानोळा-54, वाई-48 व सिंद्धखेड42 अशी पावसाची नोंद झाली आहे.
———-