वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मानवी साखळी आंदोलन

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हाथरस घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शहरभर मानवी साखळी करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नांदेडच्या जनतेने आपला असंतोष व्यक्त केला.

निवेदनात म्हटले आहे. आज सकाळी ठीक दहा वाजता महात्मा फुले यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या मानवी साखळी निषेध आंदोलनास सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक येथून वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी शारीरिक अंतर ठेवून व हातात जस्टीस फॉर मनीषा वाल्मिकी, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत साखळी आंदोलन केले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आंदोलनाचा समारोप जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचेउत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि . प्रशांत इंगोले दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले महा सचिव श्याम कांबळे, साहेबराव बेले , महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान पठाण, महानगर महासचिव शेख बिलाल हनुमंत सांगळे आदींची उपस्थिती होती