नांदेड, बातमी24ः- नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी विभाग आणि संगणक गुन्हे विभाग सुरू होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
नांदेड येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी तसेच संगणक गुन्हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. या दोन्ही प्रयोगशाळेसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नांदेडच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सुरू होणार्या या दोन्ही विभागांमुळे संबंधित कार्यवाही गतीमानतेने होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.