सकाळी आलेल्या अहवालात सर्व महिलाच

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- बुधवारी 15 नमुन्यांचा अहवाल आला.यात 6 अनिर्णित, 5 निगेटिव्ह तर 4 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यातील तीन अहवाल नांदेड तर एक अहवाल कंधार तालुक्यातील उमरज येथील आहे.

आज आलेल्या अहवालात आनंद नगर(दैना बँक)भावसार चौक (अनिकेत नगर) इतवारा(गाडीपुरा) व कंधार तालुक्यातील उमरज येथील असे चार रुग्ण आहेत.

यामध्ये भावसार चौक येथील 65 वर्षीय महिला, दैना बँक आनंद जवळील 36 वर्षीय महिला, गाडी पुरा येथील 54 तसेच सोमठाण उमजर येथील 55 महिला यांचा समावेश आहे. आज आलेले सर्व पॉझिटिव्ह अहवाल महिलांचेच आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या 391 झाली आहे.