नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.16 रोजी करण्यात 4 हजार 676 चाचण्यांमध्ये 1 हजार 351 जण बाधित आले,त्याचसोबत 1 हजार 234 जण बरे झाले तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाले तर गुरुवारी मृतांचा आकडा 19 होता.शुक्रवारी 25 मृतांची नोंद करण्यात आली आहे. आज आलेल्या अहवालात 4 हजार 676 तपासण्यापैकी 1 हजार 351 बाधित आले. यात मनपा हद्दीत 412 तर ग्रामीण भागात 919 जणांचा समावेश आहे. तसेच 20 रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.आरटी पीसीआर चाचणीत 613 व अंटीजनमध्ये 738 जण बाधित आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 65 हजार 150 एवढी झाली आहे. यातील 50 हजार 80 आहे.यात आजच्या 1 हजार 243 रुग्णांचा सुद्धा समावेश आहे.तसेच आतापर्यंत 1 हजार 202 जणांचा मृत्यू झाला आहे.आजघडीला 13 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.यातील 226 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.