जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्

नांदेड

नांदेड,बातमी24 :- शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 150 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 73 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 92 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 309 एवढी झाली असून यातील 22 हजार 704 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 785 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

शुक्रवार 6 मार्च 2021 रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 605 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज एकूण 92 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 50, देगलूर तालुक्यात 4, कंधार 1, मुदखेड 2, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 6, लोहा 3, मुखेड 1, उमरी 4 असे एकुण 73 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 48, अर्धापूर तालुक्यात 8, देगलूर 1, किनवट 7, मुखेड 2, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 2, धर्माबाद 3, हिमायतनगर 2, पुसद 2 असे एकूण 77 बाधित आढळले.
जिल्ह्यात 785 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.