पत्रकार धोत्रे यांच्या चिरंजीवाची यूपीएससी परीक्षेत पुन्हा एकदा उतुंग भरारी;आयएफएस निकालात देशात 62 व्या स्थानी

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- युपीएसएसी अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नांदेडच्या सुमितकुमार दत्ताहरी धोत्रे यांनी देशातून 62 वा क्रमांक मिळवून नांदेडचे नाव उज्वल केले आहे. याआधी सुमितकुमार धोत्रे यांनी युपीएसस्सीच्या निकालात देशातून 662 वा क्रमांक प्राप्त केला होता. एका सामान्य पत्रकाराच्या चिरंजीवाने सलग दुसऱ्यांदा मिळविलेले हे मोठे असून त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीने नांदेडच्या मान पुन्हा एकदा राज्यात उंचावला आहे.

देशपातळीवर अत्यंत महत्त्वाची असलेल्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडिनय फॉरेस्ट सर्व्हीसच्या मुलाखती 22 ऑक्टोबर रोजी पार पडल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.22) सायंकाळी घोषीत करण्यात आला. यामध्ये सुमित दत्ताहरी धोत्रे हा देशपातळीवर 62 वा क्रमांक पटकावत दुसरे मोठे यश प्राप्त केले आहे. सुमितकुमार हा नांदेडच्या टायनी शाळेच्या 2010 वर्षातील बॅचचा विद्यार्थी आहे. दहावी परीक्षेतही तो राज्यातून मागासवर्गीयात प्रथम आला होता. 12 वी चे शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण करून आयआयटी खडकपूर (वेस्ट बंगाल) येथून त्याने बीटेक ऑनर्स ही पदवी प्राप्त केली. काही काळ खाजगी नोकरी केल्यानंतर त्याने युपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने दिल्ली गाठली. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपला अभ्यास पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात त्याने देशपातळीवर भारतीय सर्व्हीसमध्ये दुहेरी यश संपादन केले आहे.त्याने आई-वडील आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.
दरम्यान, सुमितकुमार धोत्रे म्हणाले,की युपीएससीच्या परीक्षेला अपेक्षित काय असते हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. याच अनुषंगाने नेमका अभ्यास केल्यास यश मिळविणे अवघड जात नाही. मला अभ्यास करताना तेलंगणा राज्याचे आयजी महेश भागवत, छत्तीसगडचे वनआयुक्त दिलराज प्रभाकर यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. यासोबतच आई-वडीलांनीही माझ्यासाठी घेतलेले परिश्रम लाखमोलाचे असल्याचे सुमित याने सांगितले.