नांदेड, बातमी24:नांदेड येथे तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांना कोणतेही कारण किंवा कुठल्याही प्रकारची शास्ती नसताना दीड वर्षांपासून शासनाने सेवेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यांना शासनाने दीड वर्षानंतर पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन उपायुक्त म्हणून पदोन्नतीने रुजू होण्यासाबधी आदेश काढले.या संबंधीचे आदेश दि.14 रोजी प्राप्त झाले.
एक कर्तव्य दक्ष अधिकारी अशी संजय कोलगणे यांची प्रशासनात ओळख आहे. प्रशासकीय सेवेत विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर जबाबदारी पार पाडली.यापूर्वी यशदा, पुणे, बार्टी पुणे येथे विषय तज्ञ म्हणून वर्ग 1 वर्ग2 कर्मचार्यांना विभागांतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन.एमपीएससी साठी पुस्तकांचे लिखाण,उपसंचालक समाजकल्याण पुणे येथे कार्यरत असताना सामाजिक न्याय विभागांतर्गत ” वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने” या पुस्तकाचे लिखाण, लातूर येथे मुद्रा बँक योजनेनंतर्गत यशस्वी लघु उधोजकांचे व व्यावसायिकांचे मनोगत यावर लिखाण व प्रकाशन तत्कालीन अर्थमंत्री यांनी केले.
कोलगणे यांना उपायुक्त नियोजन, पुणे या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असूनही येथील कार्यकाळ पूर्ण करण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची खंत कोलगणे यांनी व्यक्त केली.