केवळाबाई हरिहरराव हत्तीहंबीरे यांचे निधन

नांदेड

नांदेड,बातमी24ः- येथील मालेगाव रोडवरील तथागत नगरमधल्या ज्येष्ठ नागरिक केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांचे आज संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिहरराव किशनराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या त्या पत्नी होत.

दिवंगत केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोकअपेक्षा या वृत्तपत्राचे संपादक डॉ. राजेश्वर पालमकर यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या पार्थिवावर उद्या दि. 30 जुलै रोजी नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.