काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के;नागरिकांनी घाबरू नये:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड

नांदेड,बातमी24:- आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मालेगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.तसेच छत्रपती चौक,फरांदे नगर,गोदावरी नगर, मालेगाव रोड,
स्नेह नगर पोलीस कॉलनी, हनुमानपेठ (वजीराबाद) मध्ये सौम्य धक्के असल्याचे नागरिकांंचे म्हणणे आहे. मात्र कुठे ही जीवित व वित्त हानी झालेली नाही.

या संदर्भात शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.