मातीशी नाळ जोडणारा आमदार; गोटया खेळण्याचा आनंदही लुटला

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः– साधा नगरसेवक झाला, तरी आमदार असल्यासारखा आव आणत असतो. अशी मंडळी खोटी-नाटी स्वतःची प्रतिमा फ ार मोठी करण्याचा प्रयत्न करतात.अशांमधील एखादा आमदार झाल्यास रुबाब पाहून सामान्य माणूस चार हात नव्हे कौसभर दूर राहतो. परंतु या सगळया मोठेपण व अभासीपणाला नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे अपवाद ठरत आले आहेत.एका गावात गेल्यावर त्यांनी तरुणांसोबत गोटया खेळण्याचा आनंद लुटत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

आमदार बालाजी कल्याणकर हे काम करण्याची प्रमाणिपणे धडपड, लोकांमध्ये जाऊन मिसळणे, कुणाचा लहान असो, की मोठा गरिबांचा असो की श्रीमंताचा अगदी कुणाचाही कसल्याप्रकारचा कार्यक्रम असो आणि विशेष म्हणजे आमंत्रण असो अथवा नसो. त्या घरी सकाळी जाऊन बालाजी कल्याणकर भेट घेणार, पाणी नसेल तर टँकर हमखास पोहचणारच. कुणाच्या घराचे बांधकामास साहित्य कमी पडत असले,तर उधारीत त्यांच्या दुकानातून खात्रीशीरपणे मिळणे हे नव्हे नाही.

भोळाराजा प्रमाणे मनाचा मोठेपणा अंगी जन्मजात, अनेक जण त्यांच्या भोळेपणाबद्दल माघारी टिंगळटिवाळकी करतात. परंतु बालाजी कल्याणकर यांनी कधीही स्वतःचा स्वभाव बदलला नाही. त्यांचा स्वभाव, काम करण्याची धडपड व तत्परतेने नेता बनविले,पण; त्यांच्यातील कार्यकर्तेपण कधीही संपले नाही. त्यामुळे मागच्या नगरपालिका निवडणुकीत ते शिवसेनेचे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले. यापूर्वी शिवसेनेचे सभागृहात पंधरा नगरसेवक होते.

सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले, तसेच काम आमदार बालाजी कल्याणकर यांच्या बाबतीत आहे. काँग्रेसच्या गडात दोन वेळा आमदार व मंत्री राहिलेल्या डी. पी. सावंत यांना मोठया फ रकाने पराभूत करून ते आमदार ही झाले. पण काम करण्याची पद्धती त्यांची कधीही बदलू शकली नाही. सकाळपासून सुरु होणार भेटीगाठी कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरुच असतो. खेडेपाडयात जाणे, गावकर्‍यांच्या समस्या ऐकणे, शक्य होईल तितके सोडविणे हा त्यांचा मुळ स्वभाव राहिला आहे.

मतदारसंघातील सुगाव येथे गेले असता तरुण मंडळी गोटया खेळत बसली होती. तरुणांशी गप्पा मारत असताना गोटया खेळण्याचा आनंद ही त्यांनी घेतला. आमदार माणूस असूनही साधी राहणीमान आणि सहजपणे मिसळण्याचा स्वभाव पाहून गावातील तरूण मंडळी प्रभावित झाली.