जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्यासह आमदार कल्याणकर रस्त्यावर

नांदेड

 

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले.यावेळी त्यांनी गाड्यावर जाणाऱ्या नागरिकांना मास्क घाला, गर्दी टाळा असे आवाहन केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तंबी दिली.

नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत चालली असून आकडा पाचशेच्या पुढे रोजची रोज जात आहे.

वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.त्याचसोबत कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाच्या ससर्गाबाबत स्वयम शिस्त पाळावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना शनिवारी सकाळी आयटीआय येथील रस्त्यावर उतरावे लागले.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,महापालिका आययकत8 डॉ. सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.
——-
अन्यथा लॉकडाऊन-इटनकर

नांदेड जिल्ह्यात वाढत चाललेली रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्यास जिल्ह्यात लॉकडाऊन करावे लागेल,असा इशारा डॉ.इटनकर यांनी देत नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन ते करायला विसरले नाहीत.