नांदेड, बातमी24: माहिती अधिकारात माहिती मिळवून एका कंत्राटी महिलेस खंडणी मागणाऱ्या मनसेच्या महिला जिल्हाध्यस उषा नरवाडे व एका पदाधिकाऱ्यास वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे.यापूर्वी तहसिलदारास खडणी मागणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती,यास घटनेच्या काही दिवसानंतर खंडणी प्रकरणात मनसेची जबाबदार पदाधिकारी अटक होण्याची दुसरी घटना आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागात कंत्राटी पदावर कार्यरत असलेली महिला सुरेखा हरिषचन्द्र सुरेकर कार्यरत आहेत. आवक जावक रजिस्टरमध्ये काही नंबर सोडले होते.या प्रकणात शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार उषा नरवाडे यांनी केली. हे प्रकरण माघार घेण्यासाठी सुरेखा सुरेकर यांच्याकडून चार पगार देण्यात यावेत,अन्यथा 40 हजार रुपये देण्याची मागणी उषा नरवाडे यांनी केली,शेवटी तीस हजार रूपये देण्यात यावेत,अशी मागणी रेटून धरली,या प्रकरणात माझी चूक नसताना मागणी केली जात असल्याची तक्रार सुरेखा सुरेकर यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात दिली.
यावरून वजीराबाद पोलिसांनी सापळा लावून उषा नरवाडे व मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष सुनेवाड या दोघांना आनंद नगर भागातून अटक केली.