बधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा;27 जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या गुरुवार दि.21 रोजी अधिक आहे.मात्र मृत्यूचा आकडा आजरोजी 27 आहे.

मागच्या 24 तासात 3 हजार 981 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.2 हजार 719 निगेटिव्ह तर 1हजार 99 पॉझिटिव्ह आले. यात 358 मनपा हद्दीत आले.त्याचसोबत 1 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 72 हजार 890 बाधित संख्या असून यातील
57 हजार 293 रुग्ण बरे झाले.सध्या 14 हजार 8 रुग्णांवर उपचार सूर असून यातील 240 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——-
27 जणांचा मृत्यू
मागच्या तीन दिवसात 27 लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.यात 8 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे.