कोरोनात कालच्यापेक्षा अधिक मृत्यू; रुग्णसंख्या स्थिर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांची संख्या कालच्या प्रमाणे नव्याने 56 रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे 1 हजार 130 तर मृत्यू संख्या 53 झाली आहे. याचसोबत इतर जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा झालेला मृत्यू संख्या वेगळीच आहे.तर 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गुरुवार दि. 23 फे बु्रवारी रोजी 218 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 149 अहवाल निगेटीव्ह तर 56 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. एकूण रुग्णंसख्या 1 हजार 130 एवढी झाली. तसेच 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुखेड-01, जिल्हा रुग्णालय-01, विष्णपुरी शासकीय रुग्णालय-03, देगलूर-01,माहुर-01, नायगाव-07, बिलोली-06, पंजाबभवन-15 तसेच खासगी रुग्णालयातील 01 असे 36 रुग्णांचा समावेश आहे.
———


मुखेड येथील 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 22 जुलै, बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 23 जुलै, मुखेड येथील वाल्मिक नगर येथील 56 वर्षीय पुरुष, देगलूर तालुक्यातील सुगाव येथील 55 वर्षीरू पुरुष, नांदेड शहरातील जवाहर नगर येथील 75 वर्षीय वृद्ध, अशा पाच जणांचा समावेश असून एकूण मृत्यू संख्या 53 झाली आहे.