जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-मागच्या दोन दिवसांपासून नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णलयात मृत्यूचे तांडव सुरू असून मृतांची संख्या 35 पार झाली आहे. या घटनेची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे.या घटनेवरून राजकीय वातावरण ही चांगलेच पेटले आहे.या पेटलेल्या वातावरणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पुलंचटपणाचा कळस गाठला.चक्क डीन असलेल्या डॉक्टरला शौचालय साफ करायला लावून मोठा पुरुषार्थी पराक्रम घडवून आणला. या घटनेवरून हेमंत पाटील यांची उरली सुरली प्रतिमा सुद्धा शौचालयसारखी वासघाण झाल्याची संतप्त भावना लोकांमधून उमट आहे.
येथील वैद्यकीय रुग्णालयातील प्रकाराने संपूर्ण राज्य हादरून गेले असून 36 तासात 35 जणांचे मृत्यू होणे, यात बालकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. येथील रुग्णालयाबाबत कायम ओरड असते. उपचार मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक तक्रारी करत असतात.मात्र याची दखल शासकीय पातळीवर कधीच घेतली गेली नाही,शिवाय लोकप्रतिनिधी ही आवाज उठवू शकले नाहीत, किंबहुना ज्यांनी आज जो काही स्टंट केला, ते खासदार हेमंत पाटील यांनी किती वेळा रुग्णालयातील प्रश्न लावून धरला.एक वेळ ते स्वतः दक्षिणमधून आमदार होते.तेव्हा काय टेंभा मिरवीला,मेरे आग्ने मै तुमहारा क्या काम है, हिंगोली सोडून नांदेडमध्ये भपकेबाजी करून काय साध्य केले,असा प्रश्न पडणं सहाजिक आहे.
रुग्णलयास पूर्णवेळ डीन नाही,याबाबत हेमंत पाटील यांनी त्यांच्याच सरकारला जाब विचारले का आता तर राज्यात त्यांचेच सरकार आहे. कधी जिल्हा नियोजन समिती बैठकीत भूमिका का घेऊ शकले नाहीत.असो हे सगळं पाहता,त्यांनी केलेला कृती पूर्णतः बकवास आणि पोकळ सहानभूती मिळविण्याचा कैविलवाना प्रयत्न होता,इतकेच म्हणता येऊ शकते.
एक ऑक्टोबर स्वच्छता मोहिमेत राजकीय नेतेगण सहभागी झाले होते.कदाचित हेमंत पाटील यांना सहभागी होत न आल्याने डीनमार्फत शौचालय साफ करून घेतले इतकाच त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो.
रुग्ण मरण पावले,यास रुग्णालय जितके जबाबदार आहे,तितकेच राज्य शासन व येथील लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहेत.याला अपवाद स्वतः हेमंत पाटील तुम्ही सुद्धा नसाल,रुग्णालयास डीन मिळत नसेल तर हेमंत पाटील डोळे उघडे ठेवून झोपा काढत होते का? सामान्य जनता सुद्धा हेमंत पाटील यांना विचारू शकते.तुम्ही जनतेचे हित जोपासू न शकल्याने तुम्ही म्हनाणे स्वतः कुठले शौचालय साफ करायला झाडू हातात घेणार,अस विचारलं आपणास झोबु नये,आमदार म्हणून जे कमावलं ते हेमंत पाटील यांनी खासदार झाल्यानंतर या प्रकरणात गमावलं इतकी नक्की होय.
लोकप्रतिनिधी म्हणून हेमंत पाटील यांना काही भान असते,तर त्यांनी रुग्णांची होणारी हेळसांड बाबत कागदोपत्री पाठपुरावा केला असता.केवळ बातमी व ब्रेकिंग मिळावी,यासाठी जो काही खटाटोप केला.त्यासाठीच जाणीवपूर्वक हे घडवून आणले.एका आदिवासी अधिकाऱ्यास तुच्छ वागणूक देऊन हेमंत पाटील यांनी स्वतःमधील हीन माणूस पुन्हा दाखवून दिला. गरीब बायको नवऱ्यास मारजोड करतो,तसाच प्रकार हेमंत पाटील यांनी डीन यांच्यासोबत शौचालय साफबाबत घडवून आणला.या प्रकारामुळे मूळ विषयाला बगल देत या विषयातील गांभीर्य कमी करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.