नांदेड महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड वाघाला महानगरपालिका महापौर मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिला आहे.पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पदाच्या शर्यतीत जयश्री पावडे यांचे स्थान अग्रस्थानी आहे.

नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसचे बलाढ्य बहुमत आहे.त्यानुसार सव्वा वर्षे याप्रमाणे महापौर सूत्र ठरले सन 2017 पासून आतापर्यंत राजीनामा देणाऱ्या मोहिनी येवनकर या तिसऱ्या महापौर ठरल्या असून यापूर्वी शीला किशोर भवरे, दीक्षा धबाले यांच्यानंतर गुरूवार दि. 30 सप्टेंबर रोजी मोहिनी येवनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सव्वा वर्षे एकास संधी याप्रमाणे मोहिनी येवनकर या दि 22 सप्टेंबर 2020 रोजी महापौर पदावर विराजमान झाल्या होत्या.एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राजीनामा चर्चा सुरू झाली होती.30 रोजी त्यांनी आपल्या पदाचा या राजीनामा मनपा आयुक्त यांच्याकडे दिला.
——-
नवीन महापौर कोण होणार याकडे लक्ष

नांदेड वाघाला महानगरपालिका महापौर पदाचा मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन महापौर कोण होणार याकडे लक्ष लागले,असून या शर्यतीत जयश्री पावडे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये ऐनवेळी काहीही होऊ शकते.त्यामुळे जयश्री पावडे यांच्यासह इतर इच्छुक ही महापौर पदाची दावेदार करू शकतात,अशी शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. महापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात लागू शकतो.