मृत माशांच्या अहवालाकडे नांदेडकरांचे लक्ष

नांदेड

नांदेड, बातमी24ः- गोदावरी नदीपात्रामध्ये हजारो मासे मरून पडल्याने मोठी खळबळ उडाली होती.मासे कशामुळे मरून पडली, यासंबंधची माहिती मिळविण्यासाठी भुजल, प्रदुषण विभाग व मस्य प्रशासनाने नमूने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. या नमून्यांचा अहवालाकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

गोदावरी नदी पात्रातील गोवर्धन घाट पुल ते शिवमंदिर इतक्याच परिसरामध्ये मासे मरूण पडले होते. हजारो माशांचा खच पाण्यावर तरंगत असल्याने मोठी दुर्गंधी व पाणी प्रदुषित होत होते. या प्रकाराकडे मनपाने शनिवारी लक्ष दिले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गोदावरी नदीवरील घाटाचा पाहणी करून अहवाल कळविण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

नदी पात्राच्या विशिष्ट भागातच मासे का मरण पावले, याची माहिती शास्त्रीय दृष्टया समजली पाहिले, या उद्देशाने मस्य अभ्यासकांनी मासे नमूने तपासणीला पाठविली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ व भुलसर्व्हेशन विभागाने पाणी नमूने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत. सदरचे अहवाल कधी येतात, प्रशासन या अहवालासंबंधी काय माहिती देते, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
——

दुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू-प्रा. डॉ. शिल्लेवार

गोदावरी नदी पात्रामध्ये दुषित पाणी मिश्र होत आहे. यातून मोठया प्रमाणात जलप्रदुषण होत असल्याने मागच्या दोन दिवसांच्या काळात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी याकडे लक्ष घालून गोदावरीनदी पात्र प्रदुषणमुक्त करण्याची मागणी सायन्स कॉलेज मस्य शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली.