गैर काम करणाऱ्या कुणाचीही गय नाही केली जाणार:-संजय रायमूलकर

नांदेड

नांदेड, बातमी24:-पंचायत समितीने तीन दिवसांच्या दोऱ्यात बऱ्याच काही अनियमितता झाल्याचे आढळून आले.या संदर्भाने त्या त्या कामाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत.यात कुणाही अधिकाऱ्याची गय केली जाणार नसून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

यावेळी बोलताना डॉ.रायमूलकर म्हणाले,की सन 2016-17 या वर्षातील लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवाल,ग्रामीण भागातील दौरे व आज या संदर्भाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.ग्रामीण भागात दौरे केले असता,काही कामे चांगले झाले,तर काही कामात अनियमितता झाल्याचे आढळून आले. अशा सर्व कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात चौकशी करून अहवाल पंचायत राज समितीकडे सादर केल्यास समिती कारवाईबाबत योग्य ते निर्णय घेईल,असे डॉ.रायमूलकर यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्य व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.