स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

नांदेड

नांदेड, बातमी24:- देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असून या सप्ताहनिमित्त शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात असून सर्वत्र मोठा उत्साह बघायला मिळत आहे. या एतिहासिक पर्वाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज कोण फडकविणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती,याचे कारण ही तसेच होते,जिल्ह्याला अद्याप पालकमंत्रीच मिळालेला नसल्याने ध्वज कोण फडकविणार असा सवाल निर्माण झाला होता,याच कोड शासनाने सोडविले असून नांदेड येथील मुख्य ध्वज हा यावेळी पालकमंत्री जिल्ह्याला नसल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते फडकविला जाणार आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून यात 18 जणांनी शपथ घेतली आहे.छोटेखाणी मंत्रीमंडल स्थापन झाले,असून अद्याप खातेवाटप ही झालेले नाही.त्यामुळे जिल्ह्यांचे पालकमंत्री ही प्रक्रिया दूरच असून उपमुख्यमंत्री मिळून असे एकोणीस मंत्र्यांना 19 जिल्ह्यात ध्वजरोहण करण्यासबंधी तर उर्वरित इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे दध्वजारोहण करणार आहेत, अमरावती येथे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
मुळात पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री तर 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. यावेळी जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने ध्वजरोहण जिल्हाधिकारी यांना करावे लागणार आहे,त्यानुसार नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथील मुख्य ध्वजारोहण हे डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे.