अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल

नांदेड

नांदेड,बातमी24:-
मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितिचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. तसेच केंद्र सरकारने सुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्या कारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केला.

येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी प्रा.डॉ. रेणुकाताई मोरे, प्रदेशउपाध्यक्ष विजय पाटील कदम, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तिरुपती पाटील भगणुरे, जिल्हाकार्याध्यक्ष प्रकाश पाटील घोगरे, जिल्हा उपाध्यक्ष माधव वडवळे, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, आत्माराम पाटील जोगदंड, महानगराध्यक्ष वि.आ. अनिल पाटील तेलंग आदी जण स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.