पैंकीच्या पैकी गुण घेणार्‍या स्नेहलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न

नांदेड
  • नांदेड, बातमी24ः कोरोना संसर्गामुळे दीड महिन्याच्या विलंबाने एसएससी बोर्डाला निकाला जाहीर करावा लागला आहे. या परीक्षेत स्नेहल मारोती कांबळे हिने पाचशे पैकी पाचशे गुण मिळविले आहेत. भविष्यात तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहेत.

बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनच बाजी मारली आहेे. लातूर विभागातून ही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. यात नांदेड जिल्ह्याचा निकाल 89 टक्के लागला आहे. या परीक्षेत बाबा नगर येथील सावित्रीबाई फु ले विद्यालयाची विद्यार्थ्यांनी स्नेहल मारोती कांबळे हिने पाचशे पैकी पाचशे गुण मिळविले आहे. या विद्यार्थ्यांची वडिल हे हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेतवर शिक्षक आहेत. हे कुटुंब बाबा नगर येथे राहते.

स्नेहलने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 94, संस्कृत-100, इंग्रजी-95, गणीत-99, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 100, समाजशास्त्र 97 व संगीत विषयाचे 9 असे पाचशे पैकी पाचशे गुण मिळवित तिचे दैदिप्यमान यश मिळविले. नांदेड जिल्ह्यातून पाचशे पैकी पाचशे गुण घेणारी स्नेहल बहुदा पहिलीच विद्यार्थीनी असावी.
——-
वैद्यकीय क्षेत्रात नाव कमविण्याची इच्छा
दहावीमध्ये चांगले गुण मिळाल्याचा आनंद आहे. बारावी व नंतर नीटमध्ये असे प्राविण्य मिळवून वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव करण्याची इच्छा असल्याचे स्नेहल कांबळे हिने सांगितले.