नांदेड,बातमी24:- एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे,या मागणीसाठी राज्यभर मागच्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरूच असून नांदेड येथील एसटी कर्मचारी(वाहक) यांना उपोषणा दरम्यान काल ह्रदय विकाराचा झटका आला होता,आज सकाळी त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एसटी कर्मचारी यांचा मृत्यूदेह मध्यवर्ती बसस्थानक येथे आणण्यात आले होते.यावेळी एसटी कर्मचारी संघटना,विविध राजकीय पक्ष,विविध सामाजिक संघटना आदींच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नांदेड एसटी वाहक दिलीप विठ्ठल वीर हे सुरुवातीपासून आंदोलनात सहभागी आहेत. दि.2 रोजी मेंदूस्त्राव झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दि.3 रोजी मृत्यू झाला.मयत वीर यांच्या मृत्यूची वार्ता कळताच सर्व कर्मचारी यांनी मध्यवर्ती बस्थानक येथे तोबा गर्दी केली होती.याचसोबत भाजप व वंचीत नेत्यांनी घटनास्थळी हजेरी लावली.मयत वीर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांच्या कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर करण्याची मागणी सर्वांनी लावून धरली.यावेळी मयत वीर यांच्या कुटूंबियांना एकच टाहो फोडल्याने वातावरण दिरंगभीर झाले होते.
एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी मध्यवर्ती बस्थानक येथे हजेरी लावल्याने येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी विष्णुपुरी येथे हलविण्यात आला.
——
दोन कर्मचारी महिला रुग्णालयात दाखल
वीर यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली,असून कर्मचारी वर्गामधून मोठा संताप व्यक्त होत आहे.या सगळ्या प्रकारात दोन महिला कर्मचारी यांची तंबीयत सुद्धा खालावली आहे,असून त्यांना खासगी रुग्णालय येथे उपचारास हलविण्यात आले.