सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांचे आज आगमन

नांदेड

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे मुंबई येथून गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी पावणे बारा वाजेच्या सुमारास नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे.

शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असतो. या दौर्‍याच्या निमित्ताने अशोक चव्हाण हे गुुरुवार दि. 13 रोजी ते नांदेड येथे येणार आहेत. विशेष विमानाने ते अकरा वाजता नांदेडच्या दिशेने रवाना होणार असून त्यांचे पावणे बारा वाजता नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे.पुढील काही दिवस त्यांचा नांदेड मुक्काम असणार आहे.