गोदावरी नदी पात्रातील मृत मासे काढण्याचे काम सुरु

नांदेड

गोदावरी नदी पात्रातील मृत मासे काढण्याचे काम सुरु

नांदेड, बातमी24ः- मागच्या दोन दिवसांपासून नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रामध्ये मासे मरण पावल्याने पाण्यावर तरंगत असल्याचा दिसून येत आहे. पाणी दुषित व दुर्गंधीयुक्त बनू नये, यासाठी मनपा प्रशासनाने पुढीलल खबरदारीची उपाययोजना म्हणून नदीमधील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

शहरातील नगिना घाट, बंदा घाट व शिवमंदिर परिसरात हजारो मासे मरण पावले आहेत. हे मासे कशामुळे मरण पावले, याबाबत तज्ज्ञ अभ्यास असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील प्रा. अर्जून भोसले यांना पाचारण करण्यात आले होते. अद्याप त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झालेला नसला, तरी मनपा प्रशासनाने मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दुपारी नदी घाटावर जाऊन पाहणी केली. या वेळी महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. डॉ. इटनकर यांनी सूचना दिल्यानंतर मनपाच्या प्रशासनाने साफ सफ ाईचे काम हाती घेतले आहे. मासे कशामुळे मरण पावले याबाबतची माहिती अधिकार्‍यांकडून अद्याप, तरी समजू शकली नाही.