सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे निधन

नांदेड

नांदेड,दि.8 जून 2023

सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय नलावडे यांचे शनिवार दि.8 जून रोजी आकस्मिक निधन झाले.मृत्यूसमयी ते 55 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 रोजी रात्री आठ वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्तीयांनी कळविले आहे.

उदय नलावडे हे कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरून कार्यरत होते.त्यांनी पाच वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.शनिवारी सकाळी त्यांच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चयात आई,पत्नी,दोन मुले,भाऊ,काका,काकू असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक अभय नलावडे यांचे ते बंधू होतं.