ग्रामीण जिल्हाध्यक्ष पाठोपाठ महानगराध्यक्ष पॉझिटीव्ह

नांदेड

नांदेड, बातमी24ः भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोनातून संसर्गमुक्त झाल्यानंतर महानगराध्यक्ष प्रवीण साले पॉझिटीव्ह आले आहेत. माझ्यासह इतर तीन पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती खुद प्रवीण साले यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याच्यांसह त्यांच्या कुटुंंबातील अन्य काही सदस्य सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

भाजप महानगराध्यक्ष उभयनलाल यादव हे सुरुवातीला कोरोना पॉझिटीव्ह आले. यादव यांच्या संपर्कात भाजप  महानगराध्यक्ष प्रवीण साले. भाजप  महानगर सरचिटणीस विजय गंभीरे व भाजप  तरोडा मंडळाध्यक्ष सुर्यकांत कदम हे आले होते. या तिघांनी चाचणी करून घेतली. यात साले. गंभीरे व कदम यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे तिघे कोविड केअर सेेटर पंजाब भवन येथे उपचार घेत आहेत.

____

दोन्ही महानगराध्यक्ष कोरोना पॉझिटीव्ह

काँग्रेसचे आमदार तथा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचा अहवाल चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आला.त्यानंतर शुक्रवारी भाजपच्या महानगरध्यक्ष प्रवीण साले यांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.