नांदेड,बातमी24: बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर शुक्रवारी आस्थापने सुरू झाली. मात्र बाजारात लोकांची झुंबड उठल्याचे बघायला मिळाले. जणू लोकांनी गर्दीचा अतिरेक केला काय अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आंतर पाळा कोरोना टाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली,असून आतापर्यंत जिल्ह्यातील 53 जणांनी कोरोनाच्या संसर्गापुढे जीव सोडला असून आजघडीला 458 जण उपचार घेत असून उर्वरित बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने लोकडाउन तबबल दि.12 जुलै ते 23 जुलैपर्यंत इतके दिवस होते. शुक्रवारी बाजारपेठ सुरू झाली आहे. बाजार कोणत्या ना कोणत्या कारणानिमित बाजारात गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. अनेक भागात वाहनांची रहदारी वाढल्याचे बघायला मिळाले. वजिराबाद भागात तर गर्दीला तुफान आले आहे. नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित आंतर पाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आले आहे.