बदल्यांचे वेळापत्रक जाहीर; चार दिवस बदल्यांचा बाजार भरणार

नांदेड

नांदेड, बातमी24ःबहुचर्चित जिल्हापरिषदेच्या बदल्यांच्या प्रस्तावावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे होणार होणार यावर शिक्कामोर्तब झाले, असून या महिन्या शेवटच्या आठवडयात चार दिवस बदल्यांची प्रक्रिया चालणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना जिल्हा परिषदेच्या वतीने बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी एक हजाराचा टप्पा पार केला आहे. बदल्या होतील की नाही, याबद्दल शंका होती. परंतु बुधवार दि. 22 जुलै रोजी बदल्यांच्या आदेशाला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया दि. 26 पासून सुरु होणार आहेत.
———
बदल्यांचे वेळापत्रक
दि.26 जुलै रोजी
महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग,लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन या विभांगाच्या बदल्या दि.26 जुलै रोजी होणार आहे.
——————
दि. 27 जुलै रोजी
आरोग्य विभाग
——————
दि.28 जुलै रोजी
ग्रामपंचायत विभाग
——————
दि. 29 जुलै रोजी
प्राथमिक शिक्षण विभाग वगळून
अर्थ विभाग
सामान्य प्रशासन
——————-
दि. 30 रोजी
शिक्षण विभाग
बदल्यासंपेपर्यंतच