पीर बुऱ्हाण नगरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- प्रयोगशाळेकडून 18 अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 17 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून आलेल्या 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

शहरातील पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय इसमाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला,पॉझिटिव्ह आलेल्या या इसमाचा मृत्यू झाला आहे.यापूर्वी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण 22 एप्रिल रोजी पिरबुऱ्हाण नगर भागात आढळून आला होता.तो इसम सुद्धा कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण व पहिला बळी ठरला होता.

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 302 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एकूण 14 झाली आहे.