सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक 

नांदेड
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे,सात जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तर 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
शनिवार दि.19 रोजी  1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली,यात 1हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच 332 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर  118 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश आहे. 13 हजार 316 झाली आहे.यातील 297 बाधितांना सुट्टी देण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 54 झाली आहे,सध्या 3 हजार 845 झाली,तर 34 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——–
सात जणांचा मृत्यू
किनवट तालुक्यातील बोधडी खु येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी मृत्यू झाला, बिलोली तालुक्यातील सगरोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी,बिलोली तालुक्यातील सगरोली येथील 70 वर्षीय महिलेचा दि.18 रोजी,नायगाव तालुक्यातील लालवनडी 66 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी,नांदेड येथील शाहू नगर येथील 46 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी,पीपलगाव येथील 80 वर्षीय महिलेचा दि.19 रोजी,दत्त नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि.19 रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 350 झाली आहे.