सहा जणांचा मृत्यू; रुग्णसंख्या शतकपार

नांदेड

नांदेड,बातमी24;- नांदेड जिल्ह्यात तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पार केले,असून 116 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर सहा जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवार दि. 14 आगस्ट रोजी 840 जणांची तपासणी करण्यात आली. यात 700 अहवाल निगेटिव्ह तर 116 जण पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 50 व अटीजन चाचणीत 66 जण समावेशीत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 815 झाली आहे.

जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये 6 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.आतापर्यत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 140 झाली आहे. तसेच 108 जण कोरोनामुक्त झाले आहेत.2 हजार 225 जण हे कोरोनामुक्त होऊन घरी पोहचले आहेत.
——
सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
किनवट तालुक्यातील शनिवार पेठ येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि.11 रोजी मृत्यू झाला. नंदीग्राम सोसायटी येथील 53 वर्षीय पुरुषाचा दि.12 रोजी,मुखेड येथील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या 60 वर्षीय पुरुषाचा दि. 13 रोजी मृत्यू झाला, नायगाव तालुक्यातील वंजारीवाडी येथील 60 वर्षीय पुरुषाचा 13 रोजी मृत्यू झाला.लोहा येथील 55 वर्षीय महिलेचा 14 रोजी तसेच मुखेड तालुक्यातील जाब येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 14 रोजी मृत्यू झाला.