नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात नांदेड जिल्ह्यातील 48 अहवाल तपासण्यात आले आहेत. यामध्ये 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर पाच रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत.यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा सुद्धा समावेश आहे.
शुक्रवार दि.19 जून रोजी सकाळी 28 तर दुपारी 18 अहवाल तपासण्यात आले होते. यामध्ये शहरातील सुंदर नगरमधील 23 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 297 इतकी झाली आहे.गुरुवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता तर शुक्रवारी ही एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे,मागच्या दोन दिवसांच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे.
जिल्ह्यात 98 उपचार घेत असून यात एक स्त्री व दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. तर आतापर्यंत 186 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
——
सहा महिन्यांचा चिमुकला कोरोनामुक्त
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय व वैधकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या 6 महिन्याचा बालक कोरोनामुक्त झाला असून त्यास डिस्चार्ज देण्यात आला आहे.यापूर्वी सुद्धा सहा महिन्यांची चिमुकलीने ही कोरोनावर मात केली होती.