नांदेड, बातमी24:- सध्या खासगी रुग्णालयाकडून कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.रुग्णांची होणारी लूट थांबविण्यात यावी,या मागणीचे निवेदन भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले,की कोरोना सारख्या वैश्विक महामारीत कोरोनाच्या रुग्णांची आर्थिक लूट खासगी रुग्णालय करत आहेत. रुग्णालयाकडून आकारल्या जात असलेल्या बिलाबाबत रुग्णाकडून मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत आहेत.
सदरच्या बिलासंदर्भात रुग्णांच्या तक्रारीचा विचार करता, प्रशासनाने चौकशी करून आर्थिक भुरदण्ड लावणाऱ्या रुग्णलयावर कारवाई करून बिल दरात सवलत देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.
———-
भाजपकडून हेल्पलाईन सुरू
कोरोनाच्या आजारासंबंधी रुग्णाची लूट होत असल्यास 9921176555 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रवीण साले यांनी केले.