बदल्या प्रक्रियेस नियमांचे काटेकोरपणे पालन :-सीईओ ठाकूर

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहा टक्के प्रशासकीय व दहा टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार सोमवार दि.26 जूनपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून बदली पात्र कर्मचाऱ्यांचे कागदोपत्री छाननी करूनच बदल्याचे आदेश निर्गमित केले जात आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.

एकेकाळी जिल्हा परिषद बदल्याचा विषय बहुचर्चित राहत असत.जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप येत असत.पदाधिकारी दालन हाऊसफुल दिसायचे.मात्र यावेळी तस काही दिसत नाही.बदल्याची प्रक्रिया प्रशासनाने नियंत्रणात आणली, असून बदली पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होता कामा नये,ही बाब कटाक्षाने पाळली जात आहे.

आजपासून सुरू झालेल्या बदल्यांची प्रक्रिया इनकॅमेरा व समुपदेशनद्वारे केली जात आहे. यामध्ये किनवट-माहूर या पेसा तालुक्यातील अनुशेषही भरला जाणार असल्याचे वर्षा ठाकूर यांनी सांगितले. आज महिला बालकल्याण विभाग,बांधकाम व लघू पाटबंधारे या विभागाच्या बदल्या झाल्या आहेत, तर दुसऱ्या सत्रात ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या होणार असल्याचे सीईओ ठाकूर यांनी सांगितले.
——-
तर तक्रार करा
बदल्यांच्या प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे.या उपर दरम्यान कुणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित कर्मचारी याने थेट सीईओ कार्यालयात येऊन तक्रार करावी,असे आवाहन सीईओ ठाकूर यांनी केले.