विद्यार्थ्यांना दाखला न देणाऱ्या शाळांवर कारवाई करा:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- दहावी पाससह इतर वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे दाखला पत्र शाळेकडून अडविले जात आहे. आशा आशयाच्या तक्रारी प्राप्त होत आहे, त्यामुळे ज्या शाळांकडून विद्यार्थी यांचे दाखला पत्र दिले जाणार नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षणाधिकार्यांना दिले.

सीईओ वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विभागाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवार दि.22 रोजी झाली. यावेळी सौ.ठाकूर यांनी शिक्षण विभागाच्या सर्वंकष आढावा घेत, गुणवत्ता वाढीबाबत कुठलीही गय केली जाणार नसल्याचा सजड दम अधिकारी व शिक्षकांना दिला.विद्यार्थीसोबत शिक्षक सुद्धा पुढील काळात गुणवत्तापूर्ण दिसले पाहिजे, दीड वर्षे असेच गेले,यापुढील काळात शिक्षकांनी अंग झटकून काम करावे, असे ठाकूर यांनी सांगितले.

खासगी शाळांकडून दाखला पत्र देण्यास आडकाठी आणली जात आहे.कोरोना काळात सर्वाना संकटाचा मुकाबला करावा लागत आहे. अशा काळात दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांकडून दाखला पत्र देण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ते गैर असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे सीईओ ठाकूर यांनी इशारा देत अशा शाळांवर कारवाई केली जाईल,अशा शाळाबाबत पालकांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या जातील असे सीईओ ठाकूर यांनी सांगितले.