प्रशासनाकडून ती अक्षम्य चूक अखेर दुरुस्त; हास्यास्पद खुलासा

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या संदर्भाने प्रशासनाचा कारभार आंधळ दळत आणि कुत्र पिठ खात असा झाला आहे. कोरोनाच्या आकडयात घोळ घालणार्‍या प्रशासनाने मृत्यूचा आकडा नोंदविण्याकडे दुर्लक्ष केले होते.या संदर्भाने बातमी24.कॉम ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने झालेली चूक दुरुस्त मृत्याची नोंद नोंदविल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा 60 झाला आला आहे. यासंबंधी प्रशासनाने केलेला खुलासा हास्यास्पद आहे.

देगलूर येथील सत्यम नगर भागात राहणार्‍या एका शासकीय अधिकार्‍याचा दि.23 जुलै रोजी मृत्यू झाला होता. तेव्हापासून या मृत्यूची नोंद आरोग्य प्रशासनाने घेतली नव्हती. या संदर्भात बातमी24.कॉम ने मृत्यूच्या आकड्यात पुन्हा घोळ; देगलूरच्या मयताची नोंद होईना, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेताना प्रशासनाने हस्यास्पद खुलासा केला आहे. यात म्हटले, की देगलूर येथील मयत व भोकरदन येथील मयताचे नाव व वय यात साम्य असल्यासारखे वाटले. जिल्हा बाहेरील मयताची नोंद प्रेसनोटमध्ये घेतली जात नाही. सदरचा रुग्ण हा देगलूर येथील सत्यम नगर येथील असल्याचे दि. 25 रोजी लक्षात आले. मयत देगलूर येथील असल्याचे 25 रोजी लक्षात आले, तर त्याची नोंद 26 रोजीच्या किंवा 27 रोजीच्या तरी प्रेसनोट घेणे अपेक्षीत होते. या प्रशासनास इतके ही गांभीर्य वाटले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मयतांची एकूण संख्या 60 झाली आहे.