ऐनवेळी राज्यपालांना बदलावे लागेल बैठक ठिकाण; ते उदघाटनही रद्द

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले आहे.स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेणार होते.मात्र मंत्रीमंडळाने राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतल्यानंतर राज्यपालांच्या बैठकीचे ठिकाण बदलून आता शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.त्यामुळे अधिकारी व पोलिसांची मोठी धावपळ बघायला मिळाली.विशेष म्हणजे विद्यापीठातील त्या दोन वसतिगृहाचे ते उदघाटन करणार होते.मात्र ते वसतिगृह वापरात असल्याचे समजताच राज्यपाल मोहदयांनी तेथून काढता पाय घेतला.

दोन दिवसांच्या नांदेड, परभणी व हिंगोली दौऱ्यासा राज्यपाल कोश्यारी यांनी आजपासून गुरुवार दि.5 पासून सुरुवात केली .सकाळी दहा वाजता नांदेड विमानतळावर आगमन झाले.त्यानंतर ते नियोजित विद्यापीठ कार्यक्रमाकडे रवाना झाले. येथील कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी गुरुद्वारा दर्शनाला रवाना झाले. विद्यापीठमधील दोन अल्पसंख्याक वसतिगृहाचे ते उदघाटन करणार होते तसा कार्यक्रम ही आला होता.मात्र ते वसतिगृह वापरास सुरू झाल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी तिकडे जाणे टाळले.

त्यानंतर राज्यपाल हे तीन वाजता विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार होते.मात्र तीन दिवसांपूर्वी आढावा बैठकीवर राज्यमंत्री मंत्रीमंडळाने आक्षेप नोंदविला होता.याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या दौर्याबाबत पत्र परिषद घेऊन उघड नाराजी व्यक्त केली होती.राज्य मंत्रिमंडळाच्या नाराजी लक्षात घेत राज्यपाल कोश्यारी यांच्या आढावा बैठकीचे ठिकाण प्रशासनास बदलावे लागले आहे.