कोरोना बाधितांची संख्येचा शुक्रवारी नवा उच्चांक; 27 जणांच्या मृत्यूची नोंद; खबरदारी घ्याःडॉ. इटनकर

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच असून शुक्रवारी आलेल्या आकडेवारी नांदेडकरांची चिंता वाढविणारी ठरली आहे. तब्बल 1 हजार 650 जण बाधित झाले आहेत. त्याचसोबत 27 जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने नोंदविली आहे.नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जिल्ह्यात 5 हजार 441 अहवालांपैकी 1 हजार 650 जणांचे नमूने कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत 713 तर अंटीजनमध्ये 937 जणांचा समावेश आहे.तसेच 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात 10 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. यात एका 35 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे.आतापर्यंत एक हजार 23 जणांचा मृत्यू झाला. सध्या 11 हजार 271 जणांवर उपचार सुरु आहेत. यात 189 जणांची प्रकृती अती नाजूक आहे.